म्हाडाच्या सदनिकेचे आमीष दाखवून ६०० जणांची फसवणूक !
म्हाडाची सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून ६०० जणांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रतीक धाईंजे याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध चालू आहे.
म्हाडाची सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून ६०० जणांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रतीक धाईंजे याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध चालू आहे.
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी.एस्.) या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने पडताळणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठवले होते.
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (‘एम्.पी.एस्.सी.’) विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका देतो. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, अशा स्वरूपाचे भ्रमणभाष करणार्या दीपक गायधने आणि सुमित कैलास यांना पोलिसांनी अटक केली आहे.
वांद्रे टर्मिन्समध्ये एका हमालाने रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला दीड घंट्यांत अटक करण्यात आली असून राहील अब्दुल शेख असे त्याचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल आहे.
जिल्ह्यातील एक ‘क’वर्ग पर्यटनस्थळ आणि ६ ‘क’वर्ग यात्रास्थळांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संमती देण्यात आली. यात आजरा तालुक्यातील पांडवकालीन रामलिंग मंदिर देवालय परिसरास ‘क’वर्ग देवालय पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
येथे दिवसाढवळ्या रेल्वेस्थानकाकडे जाणार्या पुलावर एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली. यातील आक्रमणकर्त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार आणि चुकीचे काम करणार्या अधिकार्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रशासनात आर्थिक शिस्त आणली जाईल, त्याचबरोबर चांगले काम करणार्या अधिकार्याला शाबासकीची थापही मिळेल.
लहान मुलांनी शेवटपर्यंत शांतपणे प्रवचन ऐकले. कक्षावर सनातन वही खरेदी करण्यासाठी लहान मुलांनी आई-वडिलांकडून पैसे मागून घेतले. एका धर्मप्रेमीने १० डझन सनातन वह्यांची मागणी केली.
इंटरनेट आणि दूरचित्रवाहिनी सेवा देणार्यांनी वीज खात्याच्या खांबांवर असलेल्या ‘केबल’ पुढील १० दिवसांत काढाव्यात, अशी सूचना वीजखात्याकडून देण्यात आली आहे, अशी माहिती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांनी दिली आहे.
प्रशासनाने बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते यांनी जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांना निवेदनाद्वारे केली. या संदर्भात आंदोलन करण्याची चेतावणीही या निवेदनात देण्यात आली आहे.