थोडक्यात महत्त्वाचे !

शिवी देणार्‍या मित्राची हत्या !….. कचर्‍याला भीषण आग……‘स्वीपिंग’ वाहनाद्वारे रस्त्यांची स्वच्छता !

पिंपरी (पुणे) येथील खासगी शाळेत बाँब ठेवल्याची धमकी असलेला ई-मेल !

बावधनजवळील सूस रोड येथील एका खासगी शाळेत बॉंब ठेवल्याचा ई-मेल १३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्राप्त झाला. या विषयी मुख्याध्यापिकेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस आणि बॉंब शोधक अन् नाशक पथक घटनास्थळी आले.

श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या चरणी सोन्याचा हार, ठुशी आणि चांदीची नाणी अर्पण ! 

श्री विठ्ठल रुक्मिणीदेवीच्या चरणी पुष्पा नाथा शिंदे या भाविकाने सोन्याचा हार आणि ठुशी, तसेच पुणे येथील ‘मोरया कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्स’, पुणे यांनी चांदीची नाणी अर्पण केल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आतापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही ! – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे

राहुल सोलापूरकर यांचे दोन्ही व्हिडिओ पुणे पोलिसांनी पडताळले आहेत. या व्हिडिओमध्ये अजून तरी काही गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. सध्या त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त दिला आहे.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे कुडाळ आणि देवगड येथील नगरसेवक भाजपमध्ये

भाजप कार्यकर्त्यांच्या १२ फेब्रुवारी या दिवशी येथे झालेल्या मेळाव्यात कुडाळ आणि देवगड नगरपंचायतीतील महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी, तसेच कुडाळ आणि देवगड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हिंदु विवाहितेकडून मुसलमान प्रियकराच्या साहाय्याने हिंदु पतीची हत्या

हिंदु महिलांनो, स्वतःचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’रूपी षड्यंत्राची शिकार होऊ नका !

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी १३ फेब्रुवारीला पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला.

बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प अन्यत्र हालवा ! – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची मागणी

बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प अन्यत्र हालवण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय नवीन आणि अक्षय्य ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केली आहे.

कर्नाटकातून गोव्यात प्रतिदिन ३० टन मांसाची तस्करी

कर्नाटकातून गोव्यात प्रतिदिन ३० टन मांसाची तस्करी होत असल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडून थेट गोव्याच्या मुख्य सचिवांकडे पोचली आहे. यामुळे गोव्यातील पशूसंवर्धन खाते खडबडून जागे झाले आहे.

सरकारला ‘स्मारक देवालय’ (प्रतिकृती स्मारक) बांधण्यासाठी जागा सापडेना !

पोर्तुगिजांनी त्यांच्या राजवटीत गोव्यातील सहस्रो मंदिरे उद्ध्वस्त केली. या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी सरकारने तज्ञ लोकांची एक समिती स्थापन केली. या समितीने तिचा अहवाल ऑक्टोबर २०२३ मध्ये गोवा सरकारला सादर केला.