मंचर येथील महिलेला भूसंपादित भूमीचा मोबदला न दिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साहित्य जप्त !

पुणे नाशिक महामार्गावर बाह्यवळणासाठी १०० शेतकर्‍यांच्या भूमीचे संपादन अल्प मोबदला देऊन करण्यात आले.न्यायालयानी महामार्गाच्या कार्यालयात जप्ती वॉरंट बजावले.

बांदिवडे, फोंडा येथील सौ. ज्योती ढवळीकर (वय ६३ वर्षे) सनातनच्या १३२ व्या (समष्टी) संतपदी विराजमान

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या वेळी  पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि साधक उपस्थित होते. या वेळी सर्वांची भावजागृती झाली.

उमाटे कॉलेज, खामला येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांचे योगदान’ यावर प्रवचन

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

पोलीस कसायांविरुद्ध तक्रार घेण्यास नकार देऊन गोरक्षकांवर दबाव टाकतात

समीर शेंडे यांनी, ‘‘तुम्ही कसायांची आणि आमची हानी का करता, येथून पुढे माझ्या हद्दीत काही करायचे नाही, नाहीतर मला तुमच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे नोंद करावे लागतील’’, अशा प्रकारे गोरक्षकांना धमकावले.

तिलारी धरण असूनही दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट

तालुक्यातील तिलारी आंतरराज्य धरणामुळे प्रकल्पबाधित झालेली गावे पुनर्वसनाच्या गोंडस नावाखाली अन्यत्र वसवण्यात आली आहेत. या गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.

गोव्यात मराठी भाषेवर होणारा अन्याय दूर करा !

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा २४ फेब्रुवारी या दिवशी समारोप झाला. या वेळी गोव्यात राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत राज्यशासनाने कोकणी भाषा अनिवार्य केली असून मराठी भाषेला डावलले आहे.

आज वाशी येथे अभिनेता मकरंद अनासपुरे यांचे ‘अनुभवाचे बोल’ या विषयावर मार्गदर्शन !

श्री सोमेश्‍वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्‍टच्‍या वतीने वाशीतील एम्.जी. कॉम्‍प्‍लेक्‍स येथे महाशिवरात्रीच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे

देशातील ‘एआय्’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

उत्तरप्रदेशमध्ये महाकुंभपर्वाचे उत्तम व्यवस्थापन करण्यात आले. नाशिक येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यामध्ये गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षाव्यवस्था आदींसाठी अत्याधुनिक उपाययोजना केल्या जातील.

राज्यातील विजेच्या खांबांवरील इंटरनेट जोडणीच्या केबल हटवणे चालूच रहाणार

वीज खात्याने विजेच्या खांबांवरून इंटरनेट जोडणीच्या केबल्स टाकल्या जात असल्यावरून संबंधित केबलचालकांना दंड आकारला आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्‍या निषेधार्थ श्री संप्रदायाकडून राज्‍यभर आंदोलन

जगद़्‍गुरु रामानंदाचार्य स्‍वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्‍या निषेधार्थ श्री संप्रदायाकडून २४ फेब्रुवारी या दिवशी राज्‍यभर तीव्र आंदोलन केले.