‘यू ट्यूबर’ रणवीर अलाहबादिया याच्या विरोधात तक्रार !

नैतिकतेची परिसीमा ओलांडलेल्या अलाहबादिया यांच्या लोकप्रियतेचा विचार न करता त्यांना योग्य शिक्षा झाली, तर पुढे कुणी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ उठवून भारतीय संस्कृतीला धक्का लागेल, अशी वक्तव्ये किंवा कृती करणार नाही !

श्री हालसिद्धनाथ आणि सद्गुरु बाळूमामा देवस्थान येथे भाकणूक करणारे बाबूराव कृष्णा डोणे महाराज यांचा देहत्याग !

आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवस्थान आणि आदमापूर येथील सद्गुरु बाळूमामा देवस्थान येथील मुख्य भाकणूकदार बाबूराव कृष्णा डोणे महाराज (वय ७० वर्षे) यांनी वाघापूर (तालुका भुदरगड) या मूळगावी ९ फेब्रुवारीला देहत्याग केला.

संत मीराबाईंचे चरित्र महिलांसह युवतींना प्रेरणाच देते ! – पूज्य श्री राधाकृष्णजी महाराज

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट द्वारे शहरात प्रथमच आयोजित केलेल्या ‘संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्या’चे द्वितीय पुष्प गुंफतांना नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये ते बोलत होते.

हरियाणातील एका शाळेचे विद्यार्थी प्रतिदिन गाय आणि पक्षी यांसाठी डब्यातून आणतात पोळी !

गंगा गावातील श्रीगुरु जांभेश्वर शिक्षा समिती संचालित प्राथमिक शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी प्रतिदिन त्यांच्या डब्यामध्ये गाय आणि पक्षी यांसाठी पोळी आणतात. शिक्षकदेखील या उपक्रमात सहभागी होत डबा आणतात.

पिंपरी कुदळवाडीतील २२२ अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, गोदामांवर हातोडा !

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पहिल्या दिवशी ४२ एकर क्षेत्रफळावरील १८ लाख ३६ सहस्र ५३२ चौरस फुटावरील २२२ बांधकामे भुईसपाट केली. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबवली.

१४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्यापासून वंचित ! – सोनिया गांधी

काँग्रेसचे राज्य असतांना लोकांचा कुपोषणामुळे मृत्यू होत होता. त्या तुलनेत आता सरकारकडून विनामूल्य धान्य मिळत आहे. याचे कधी सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे का ?

प्रयागराज महाकुंभ येथे ३ दिवसांत ३ कोटींहून अधिक भाविकांनी केले स्नान !

१३ जानेवारीपासून म्हणजेच महाकुंभ चालू झाल्यापासून ते ९ फेब्रुवारीपर्यंत ४३ कोटी ५७ लाख भाविकांनी त्रिवेणी संगम येथे स्नान केले आहे. गेल्या ३ दिवसांत प्रत्येक दिवशी १ कोटी म्हणजे ३ दिवसांत ३ कोटींहून अधिक भाविकांनी घाटांवर स्नान करून प्रयागराज येथे नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुणे येथे हिंदु संघटनांचा विराट मोर्चा !

सर्वत्र भगवे झेंडे आणि ‘बांगलादेशी घुसखोरांना पळवून लावा’ असे सांगणारे फलक यांमुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला होता.

मुंबईत ८ किलो गांजा जप्त

सीमा शुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या सागर वधीया आणि निगम रावल या प्रवाशांकडून सव्वा आठ किलो गांजा जप्त केला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या मुलाची आईकडून हत्या ! ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राजघराण्यातील लोकांना दाखवावा !..

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला.