रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !

याविषयी प्रशासनाने जनतेला उत्तर देणे अपेक्षित आहे !

स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्याची पुणे महानगरपालिकेची विनंती !

शहरातील स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. स्मशानभूमीसाठी वायू प्रदूषणाचे नियम नसल्याविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

लोकसभा मतदानदिनी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार ?

पुणे लोकसभा मतदारसंघात १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्याकरता पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना १२ आणि १३ मे या दोन्ही दिवशी निवडणुकीचे काम देण्यात येणार आहे.

अधिकचे पाणी घेऊनही पुणे शहरांतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही पाण्याच्या मूलभूत समस्येसाठी नागरिकांना खर्च करावे लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

पुणे येथील १०० खासगी रुग्णालयांचे परवाना नूतनीकरणच नाही !

रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणचे परवाना नूतनीकरण न हाेणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्यासारखेच आहे !

पुणे येथे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय फोडले !

शहरातील उपनगर रामटेकडी भागात पाण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोप करत संतप्त झालेल्या नागरिकांनी लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय फोडले.

मॅफेड्रॉन बाळगल्याच्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून पुणे येथे २ धर्मांधांना अटक !

आरोपी इस्तियाक आणि अब्दुल करीम हे दोघे १६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन विक्रीसाठी मोई गावातील भैरवनाथनगर येथे आले होते. त्यांच्याकडून मॅफेड्रॉन आणि ३ भ्रमणभाष असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे शहरातील टँकरचालकाने पैशांची मागणी केल्यास तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध !

तक्रारींवर काय उपाययोजना केली ? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे !

‘रेबीज फ्री पुणे’ करण्यासाठी महापालिका १ लाख ८० सहस्र प्राण्यांना लस देणार !

अभिनंदनीय निर्णय असला, तरी ‘उशिरा सुचलेले शहाणपण’, असेच म्हणावे लागेल !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे संशयित आतंकवादी चिनी महिलेची विवाह नोंदणी !

अशा गोष्टींमुळेच पुण्यातील आतंकवाद संपत नाही. त्यासाठी संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !