५०० कोटी रुपयांच्या निधीतून सिद्धिविनायक मंदिराचे होणार सुशोभीकरण ! – सदा सरवणकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास
या निधीचा आणि मंदिर न्यासाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे या निधीमध्ये टक्केवारी खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सडेतोड स्पष्टीकरण श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.