Belgaum Stone Pelting At Temple : बेळगाव येथे मुसलमानाकडून मंदिरावर दगडफेक

स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले

बेळगाव – येथील पांगुळ गल्लीत १९ मार्चच्या रात्री अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासीर नावाच्या युवकाने मद्यप्राशन करून दगडफेक केली. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हातात दिले. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्थानिकांनी यासीरला पकडून खांबाला बांधले आणि मारहाण केली. त्या वेळी यासीरने म्हटले की, माझ्याकडून चूक झाली आहे, मला क्षमा करा. मी मंदिरावर दगडफेक केली; कारण मागच्या आठवड्यात होळीच्या वेळ एका व्यक्तीने येथे बुरखा घालून नाच केला होता, त्यामुळे मला राग आला होता. (मुसलमानांना त्यांच्या धर्मातील वेशभूषेचा अवमान करणार्‍यांचा राग येतो, तर हिंदु स्वतःच स्वतःच्या धर्माचा अवमान करत असतात ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मशिदीवर किंवा दर्ग्यावर कधी कोणता हिंदु दगडफेक करतो का ? तरीही या देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’ आणि ‘हिंदु आतंकवादी आहेत’, अशी ओरड केली जाते !