नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंद होणारच ! – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कोरोना संकट काळातील ‘दळणवळण बंदी’चा निर्णय प्रशासनाने रहित केल्यानंतर एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.

(म्हणे) ‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमातून हिंदुत्व विचारधारेचा प्रचार !’ – असदुद्दीन ओवैसी यांची भाजपवर टीका

गेल्या ७४ वर्षांत भारतातील हिंदूंना त्यांचा गौरवशाली इतिहास दडपून टाकून मोगलांचा उदो उदो करणारा इतिहास शिकवला जात होता. आता जर सरकार त्यात पालट करत असेल, तर ओवैसी यांच्यासारखे थयथयाट करणारच !  

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे एस्.टी. बसवर ‘संभाजीनगर’ असा फलक लावल्याच्या कारणावरून एम्.आय.एम्.कडून दगडफेक !

औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते.

देशात रहाणार्‍या एका समुदायाला ते देशभक्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागते ! – असदुद्दीन ओवैसी

‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांना, जिहादी आतंकवाद्यांना उघडपणे विरोध न करणार्‍यांना; बाबर, औरंबजेब यांची तळी उचलणार्‍यांना ‘हा देश आपला वाटतो’, ‘ते देशभक्त आहेत’, हे कसे मान्य करता येईल ?

(म्हणे) ‘बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, हे पुढच्या पिढीला सांगणार !’ – असदुद्दीन ओवैसी

भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे !

रोहिंग्यांना स्वतःहून देशाबाहेर का घालवत नाही ?

‘बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका.’ मग मी ते करतो, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना दिले.

भाग्यनगरचे रणांगण !

काँग्रेसने ७० वर्षे मुसलमानांना वापरले आणि आता ‘एम्.आय.एम्., तेलंगाणा राष्ट्र समिती आदी पक्षही केवळ स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरून घेत आहोत’, हे त्यांना कळेपर्यंत कदाचित् त्यांचे अधिक पतन झालेले असेल. कसेही असले, तरी यंदाची निवडणूक एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांना कठीण जाणार आहे, हे निश्‍चित !

(म्हणे) ‘तुमची पिढी संपेल; मात्र हैद्राबादचे नाव भाग्यनगर होणार नाही !’ – असदुद्दीन ओवैसी यांची दर्पोक्ती  

अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, तर हैद्राबादचे भाग्यनगर का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्रात गुलामगिरीची प्रत्येक खूण नष्ट करण्यात येईल ! निजामाच्या वंशजांची दर्पोक्ती कायमस्वरूपी दडपण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

धाडस असेल, तर भाजप सरकारने चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावे ! – असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान

ओवैसी म्हणाले, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात ? तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात आणि चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा, आम्ही तुमची प्रशंसा करू !

ओवैसी विकास नाही, तर रोहिंग्यांना भारतात आणण्याची मागणी करतात ! – खासदार तेजस्वी सूर्या, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे  इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.