इस्लामिक स्टेटच्या नियतकालिकातून भारतातील मुसलमानांना ‘बाबरी’ पुन्हा उभारण्याची चिथावणी !

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो. त्यामुळेच ते त्यांच्या धर्मबांधवांना धर्माच्या आधारे चिथावणी देऊन जिहाद करण्याचे आवाहन करत आहेत, हे लक्षात घ्या !

कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या भावनेतूनच बाबरी ढाचा पाडण्यात आला ! – रा.स्व. संघाचे महासचिव अरुण कुमार

‘श्रीरामजन्मभूमीवर पुन्हा श्रीराममंदिर बांधण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली हिंदूंची फसवणूक केली जात आहे’, अशी भावना हिंदूंच्या मनात निर्माण झाल्याने बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी येथे केले.

जे.एन्.यू.मध्ये बाबरीच्या समर्थानार्थ साम्यवादी विचारसणीच्या विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन

भारतात मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची साडेचार लाख मंदिरे पाडली, ३ दशकांपूर्वी धर्मांधांनी काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडले, तसेच तेथील शेकडो मंदिरांवर आक्रमणे केली, यांविषयी साम्यवादी विद्यार्थी संघटनांना आंदोलन करावेसे वाटत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन करणे, हे गंभीर आहे !’

ज्या बाबराने अनेक हिंदूंची हत्या केली, तसेच अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधली, त्या बाबराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करायला हवे, असे अबू आझमी यांना वाटते का ?

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, श्रीराममंदिराच्या आंदोलनात पहिली ‘एफ्.आय.आर्.’ हिंदूंविरुद्ध नव्हे, तर शिखांविरुद्ध झाली होती. यावरून ‘शीख हे सनातन हिंदु धर्माचे अभिन्न अंग आणि धर्मरक्षक योद्धा आहेत’, हे सिद्ध होते.

गोध्रा हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा !

गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्याकरता एक आयोग नेमला होता; परंतु त्या आयोगाचा परिणाम होऊ नये; म्हणून लालूप्रसाद यांनी न्यायमूर्ती बॅनर्जी यांचा आयोग नेमला. ‘रामसेवकांना बाहेर जाळून मारलेले नाही’, अशा प्रकारचा निष्कर्ष त्यांनी काढला होता !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. श्री. नितीन फळदेसाई या पत्रकात पुढे म्हणतात, ‘‘बाबरी मशीद पुन्हा बांधली जाणार’, अशा अशायाचे फलक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही आतंकवादी संघटना गोव्यात कशी लावू शकते ?

‘पी.एफ्.आय.’वर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे मागणी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनेकडून गोव्यातील इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गोवा आणि बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी ‘पी.एफ्.आय.’कडून लावण्यात आली बाबरी ढाचा पुन्हा उभारण्याविषयीची भित्तीपत्रके !

पी.एफ्.आय.चा अनेक देशविरोधी आणि हिंदुविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असतांना केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्यासाठी कुणाची वाट पहात आहे ?

(म्हणे) ‘बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, हे पुढच्या पिढीला सांगणार !’ – असदुद्दीन ओवैसी

भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे !