धाडस असेल, तर भाजप सरकारने चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावे ! – असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान

भाग्यनगर (तेलंगाणा) – धाडस असेल, तर चिनी सैन्यावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून दाखवावे. भाजप लडाखमध्ये असे धाडस का दाखवत नाही, जिथे चीनने भारताची भूमी कह्यात घेतली आहे, असे आव्हान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपला दिले आहे. ते येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.

 (सौजन्य : Hindustan Times)

ओवैसी म्हणाले की, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात ? तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात आणि चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा, आम्ही तुमची प्रशंसा करू. सर्जिकल स्ट्राइक करून चिनी सैन्याला पळवून लावा. आपले सैनिक जेथे हुतात्मा झाले होते, तेथे तुम्ही धाडस दाखवणार नाही. भारतीय भूमी कह्यात घेणार नाही; मात्र भाजपचा एक नेता म्हणतो की ‘आम्ही जुन्या भाग्यनगर शहरावर सर्जिकल स्ट्राइक करू.’ तुम्ही काय सर्जिकल स्ट्राइक करणार? तुम्ही शहरासाठी काय केले आहे?, असा प्रश्‍न ओवैसी यांनी भाजपला विचारला.