ओवैसी विकास नाही, तर रोहिंग्यांना भारतात आणण्याची मागणी करतात ! – खासदार तेजस्वी सूर्या, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

भाग्यनगर (तेलंगाणा) – एम्.आय.एम्.चे नेते असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी हे रोहिंग्या मुसलमानांना भारतात आणण्याची मागणी करतात; मात्र ते कधी विकासाची भाषा करत नाहीत, अशी टीका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी येथे एका प्रचार सभेत केली. भाग्यनगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. ‘एम्.आय.एम्.ला यांना देण्यात आलेले मत भारताच्या विरोधात आणि ज्या स्तंभांवर भारत उभा आहे, त्याच्या विरोधात असेल’, असा दावाही तेजस्वी सूर्या यांनी केला.

तेजस्वी सूर्या पुढे म्हणाले की, ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे  इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. आज भाग्यनगर पालटा, उद्या तेलंगाणा पालटेल, परवा दक्षिण भारत आणि नंतर पूर्ण देश पालटेल.