एम्.आय.एम्.च्या तालुकाध्यक्षासह ११ धर्मांधांवर गुन्हा नोंद : ५ धर्मांधांना अटक
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! या घटनेवरून औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते. क्रूर औरंगजेबाप्रती निष्ठा दाखवणार्या अशा धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे!
संभाजीनगर – १८ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील वैजापूर येथे ‘संभाजीनगर’ असा फलक असलेली एस्.टी. (राज्य परिवहनची) बस फोडल्याच्या प्रकरणी एम्.आय.एम्.च्या तालुकाध्यक्षासह ११ धर्मांधांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ५ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.
( सौजन्य : ABP MAZA )
१८ जानेवारी या दिवशी चालक पवार यांनी चाळीसगाव येथून एस्.टी. बस शिरूरमार्गे वैजापूरला आणली. पवार यांनी नेहमीप्रमाणे ही बस एस्.टी.च्या आगारात उभी केली. या बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असा फलक लावलेला होता.
MIM leaders call renaming Aurangabad to Sambhajinagar ‘Manuwadi’ and ‘racist’, create ruckus at bus depot https://t.co/R3oxFUwcHm
— OpIndia.com (@OpIndia_com) January 21, 2021
दुपारी २.४५ वाजता अचानक एम्.आय.एम्.च्या धर्मांधांनी दगडफेक करत बसच्या समोरील काचा फोडल्या. या प्रकरणी एम्.आय.एम्.चा तालुकाध्यक्ष अखिल कुरेशी यांसह शेख कलीम शेख अब्दुल, शेख अरबाज, जुनेद सय्यद जमील सय्यद, शेख राजू शेख मजीद यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.