(म्हणे) ‘तुमची पिढी संपेल; मात्र हैद्राबादचे नाव भाग्यनगर होणार नाही !’ – असदुद्दीन ओवैसी यांची दर्पोक्ती  

  • अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, तर हैद्राबादचे भाग्यनगर का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्रात गुलामगिरीची प्रत्येक खूण नष्ट करण्यात येईल !
  • निजामाच्या वंशजांची ही दर्पोक्ती कायमस्वरूपी दडपण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

भाग्यनगर (तेलंगाणा) – तुमची संपूर्ण पिढी संपून जाईल; पण शहराचे नाव हैद्राबादच रहाणार आहे. निवडणूक हैद्राबाद आणि भाग्यनगर यांच्यामध्ये आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, हैद्राबादचे नाव पालटू नये, तर एम्आयएम्लाच मतदान करा, असे आवाहन एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथे केले. येथील भाग्यनगर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यानिमित्त प्रचार करतांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेमध्ये सत्तेवर आल्यास हैद्राबादचे नाव पालटून भाग्यनगर केले जाईल, असे म्हटले होते. त्यावर ओवैसी यांनी वरील आव्हान दिले.

 (सौजन्य : इंडिया टुडे)

ओवैसी म्हणाले की, भाजप हैद्राबादचे नाव पालटू इच्छित आहे. त्यांना सर्व जागांची नांवे पालटायची आहेत. तुमचे नाव पालटले जाईल; पण हैद्राबादचे नाव पालटले जाणार नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि हैद्राबादचे नाव पालटणार असल्याचे म्हणतात. तुम्ही काय ठेका घेतला आहे का ? असा प्रश्‍नही ओवैसी यांनी विचारला.