देशात रहाणार्‍या एका समुदायाला ते देशभक्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागते ! – असदुद्दीन ओवैसी

‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांना, जिहादी आतंकवाद्यांना उघडपणे विरोध न करणार्‍यांना; बाबर, औरंबजेब यांची तळी उचलणार्‍यांना ‘हा देश आपला वाटतो’, ‘ते देशभक्त आहेत’, हे कसे मान्य करता येईल ? काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना हाकलून लावणार्‍यांना देशभक्त कसे मानायचे ?

असदुद्दीन ओवैसी व डॉ. मोहन भागवत

भाग्यनगर (तेलंगाणा) – एका धर्माच्या अनुयायांना आपोआप देशभक्तीचे प्रमाणपत्र दिले जात आहे, तर दुसर्‍याला ‘भारतात रहायचे आहे आणि स्वतःला भारतीय म्हणण्याचा अधिकार आहे’, हे सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च करावे लागते, अशी टीका एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विधानावरून केली.

ओवैसी पुढे म्हणाले की,

१. ‘बहुतेक भारतीय विश्‍वास न ठेवता देशभक्त आहेत’, असे समजणे तर्कसंगत आहे. हे केवळ संघाच्या अज्ञानी विचारसरणीमध्ये आहेे.

२. गांधी यांची हत्या करणार्‍या गोडसेविषयी काय सांगाल ? नेल्ली हत्याकांड, वर्ष १९८४ शीखविरोधी दंगल आणि वर्ष २००२ गुजरात दंगलीला उत्तरदायी असणार्‍या लोकांविषयी काय बोलणार? सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उत्तर देणार का ? (वर्ष १९४७ ची भारताची फाळणी, त्या वेळी १० लाख हिंदूंचे शिरकाण, हिंदू महिलांवरील बलात्कार, स्वामी श्रद्धानंद यांची हत्या, केरळमधील मोपला मुसलमानांनी केलेले हिंदूंचे हत्याकांड यांविषयी ओवैसी उत्तर देणार का ?- संपादक)