वणवा लागल्याच्या प्रकरणी सातारा येथे मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंड
वाई तालुक्यातील रेणावळे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पार्टे आणि शिक्षिका नीलिमा खरात यांना वाई येथील न्यायालयाने प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. शाळेच्या आवारातील पालापाचोळा गोळा करून मुख्याध्यापक पार्टे आणि शिक्षिका खरात यांनी त्याला आग लावली.