विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाची कारवाई !

मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्‍या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर धाडी !

प्लास्टिक पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर उल्हासनगर महानगरपालिका, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी धाडी घातल्या.

सातारा येथे वाळू तस्करांची ८० वाहने शासनाधीन !

वाळू तस्करांवर जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाळू तस्करांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद असून त्यांची ८० हून अधिक वाहने पोलिसांनी कह्यात घेतलेली आहेत.

अमेरिकेत विषारी इंजेक्शनने गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न अपयशी !

विदेशांत मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची भारतात चर्चा होत असतांना भारतात दोषींना देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा कशी कार्यान्वित होईल ?, याचीही चर्चा होणे आवश्यक !

Portsmouth University : वर्णद्वेषातून नियुक्ती नाकारल्याने भारतीय प्राध्यापिकेला ४ कोटी ६९ लाख रुपये देण्याचा आदेश  

ब्रिटनमध्ये अजूनही वर्षद्वेष चालत असेल, तर संपूर्ण जगाने ब्रिटनवर बहिष्कार घालणे आवश्यक आहे !

गोवा : संरक्षित स्मारकांचे अनुमतीविना चित्रीकरण केल्यास ५० सहस्र रुपये दंड

संरक्षित ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या स्थळी गेली काही वर्षे प्रत्येक वर्षी फेस्त (जत्रा) आयोजित केले जाते. त्यासाठी पुरातत्व विभागाची अनुमती घेतली जाते का ? आणि अनुमती असेल, तर त्यासाठी किती शुल्क आकारले जाते ?

सातारा येथे विज्ञापन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये फलक लावणार्‍यांना ४० सहस्र रुपयांचा दंड !

सातारा नगरपालिकेने विज्ञापन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विज्ञापनांचे फलक लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पालिकेने या फलकांविषयी ४० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.

राज्य परिवहन महामंडळातील ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील गतीदर्शक यंत्र बंद !

महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.

Boycott Sunburn : न्यायालयाने दणका दिल्यावर सनबर्नकडून सरकारकडे रक्कम जमा !

सनबर्नच्या आयोजकांनी कोमुनिदादला कोणतीही रक्कम न देता जागा कह्यात घेऊन संगीत कार्यक्रम चालू केल्याविषयी हणजूण येथील एका स्थानिकाने तक्रार केली होती.

Boycott Sunburn : ध्वनीप्रदूषणावरून ‘सनबर्न’वर पहिल्या दिवशीच कारवाई

न्यायालयाने नोंद घेतल्यामुळे यावर्षी कारवाई झाली. त्यापूर्वी प्रशासन आणि पोलीस स्वतःचे कर्तव्य विसरले होते कि त्यांचे आर्थिक हितसंबंध होते ?