बँक घोटाळ्यांच्या प्रकरणी सीबीआयची १५ राज्यांमध्ये धाड

देशातील विविध बँक घोटाळ्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून सीबीआयने ५ नोव्हेंबरला महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये एकाच वेळी १६९ ठिकाणी धाड टाकली आहे. सीबीआयकडे सध्या एकूण ३५ बँक घोटाळ्यांची प्रकरणे तपासासाठी असून या घोटाळ्यांतील रक्कम ७ सहस्र कोटी रुपये आहे.

निर्देशांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेकडून ३ बँकांवर दंडात्मक कारवाई

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने पुणे येथील जनता सहकारी बँक, जळगाव येथील पिपल्स सहकारी बँक आणि बंधन बँक यांच्यावर रिझर्व्ह बँकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.