फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात याचिका करणार्याला ५० सहस्र रुपयांचा दंड !
नवी देहली – सरकारच्या मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करणे याला देशद्रोह म्हटले जाऊ शकत नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरचे खासदार फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधातील देशद्रोहाची याचिका फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्याला ५० सहस्र रुपयांचा दंडदेखील ठोठावला.
#FarooqAbdullah के खिलाफ जनहित याचिका खारिज: #SupremeCourt ने कहा- सरकार की राय से अलग विचार राजद्रोह नहीं
https://t.co/uzZjSaUnhX— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) March 3, 2021
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम ऑगस्ट २०१९ मध्ये रहित करण्यात आल्यानंतर फारूख अब्दुल्ला यांनी भारताच्या विरोधात पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून साहाय्य घेतल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता; मात्र आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्ता सादर करू शकला नाही.