देशात कोरोनाचा संसर्ग पसरवला ! – परदेशी तबलिगींची न्यायालयात स्वीकृती

दीड सहस्र रुपयांच्या दंडावर सुटका

जर परदेशी तबलिगी अशी स्वीकृती देत असतील, तर भारतीय तबलिगींनी काय केले असेल, याची कल्पना येते ! अशांना कठोर शिक्षा केली पाहिजे !

तबलिगी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – विदेशातील ४९ तबलिगी जमातच्या लोकांनी ‘भारतात कोरोनाचा प्रसार केला’ असा त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आरोप स्वीकारला आहे; मात्र ‘आम्ही असे जाणीवपूर्वक केले नाही’, असे न्यायालयाला सांगत पुन्हा त्यांच्या देशात जायचे असल्याने अल्प शिक्षा करण्याची मागणी केली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना आतापर्यंत कारागृहात घालवलेल्या दिवसांची शिक्षा आणि दीड सहस्र रुपये दंड ठोठावला आहे.

या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.

 

उत्तरप्रदेशातील बहराईच, सीतापूर, भदोही आणि लक्ष्मणपुरी येथे त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले होते. ते सर्व थायलँड, किर्गिस्तान, कजाकिस्तान आणि बांग्लादेश येथील नागरिक आहेत.