दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दौंड (पुणे) येथे ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त !; पुणे येथे शाळकरी मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार !…
शहरातील पोलिसांनी एका ट्रकमधून १४१ गोण्यांमध्ये भरलेला ५४ लाख ९९ सहस्र ८०० रुपये किंमतीचा गुटखा आणि १० लाख रुपयांचा ट्रक जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक रवि होळकर याला पोलिसांनी अटक केली आहे.