मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने पुण्यातील सेवा विकास सहकारी अधिकोषाला ५५ लाख रुपयांंचा दंड ठोठावला आहे. अधिकोषाच्या नियमनातील त्रुटीमुळे आरबीआयने हा सेवा दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्याने दंड का ठोठावू नये, अशी कारणे दाखवा नोटीस आरबीआयने सेवा विकास सहकारी अधिकोषाला बजावली होती. त्यावर अधिकोषाने दिलेल्या उत्तरावरून आरबीआयला नियमांचे उल्लंघन झाल्याची निश्चिती झाली आहे. त्यावरून हा दंड ठोठावला आहे. असे असले, तरी अधिकोषाचा व्यवहार अथवा ग्राहकांच्या सेवेशी या कारवाईचा संबंध नाही, असे आर्बीआयने म्हटले आहे.