मुसलमान संघटनेकडून विरोध
भारतात अशी बंदी घातली जाईल, तो सुदिन !
झुरीच (स्वित्झर्लंड) – स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळाला भेट देतांना बुरखा घालण्यास अनुमती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याविषयावर सार्वमत घेण्यात आले होते. सार्वमतामध्ये बुरखा बंदीच्या बाजूने ५१.२ टक्के, तर विरोधात ४८.८ टक्के मत पडली. युरोपातील फ्रान्स, बेल्जियम आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये या प्रकारची बंदी यापूर्वी लागू करण्यात आलेली आहे.
देशातील ‘द सेंट्रल कौन्सिल ऑफ मुस्लिम इन स्वित्झर्लंड’ या संघटनेने या निर्णयाचे ‘काळा दिवस’ म्हणून वर्णन केले आहे. (मुसलमान, मग ते कुठल्याही देशाचे असोत, ते त्या देशाचे नियम किंवा कायदे न मानता स्वतःच्या नियमांवर ठाम असतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक) या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याची, तसेच हा निर्णय मोडणार्या महिलांना दंड भरण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून निधी गोळा करण्याची घोषणाही या संस्थेने केली आहे.