स्वित्झर्लण्डच्या सेंट गालेन प्रांतामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

स्वित्झर्लण्डच्या सेंट गालेन प्रांतामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याच्या विषयावर जनमत घेण्यात आले. त्या वेळी लोकांनी बंदीच्या बाजूने मतदान केले.

नेदरलॅण्डमध्ये काही सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावर बंदी

युरोपमधील नेदरलॅण्डनेही देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. नेदरलॅण्डच्या संसदेने या संदर्भातील कायद्याला मान्यता दिली; मात्र सर्वच ठिकाणी बुरख्यावर बंदी नाही, तसेच हिजाबवरही बंदी घातलेली नाही.

डेन्मार्कमध्येही बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी

डेन्मार्कने अन्य युरोपियन देशांप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. डेन्मार्कच्या संसदेने या संदर्भात कायदा संमत केला आहे. मानवी अधिकार कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

इस्लामी देश इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी येणार !

इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करतांना मुसलमान महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. इजिप्तच्या संसदेकडून या संदर्भात कायदा करण्यात येणार आहे.

ठाणे येथील शाळेत सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थिनींसह पालकांना हिजाब घालून येण्यास बंदी

मुंब्रा येथील सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना सुरक्षेच्या कारणास्तव हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मतदानाच्या वेळी बुरख्यातील महिलांचा चेहरा पडताळल्यावरच मतदान करता येणार !

उत्तरप्रदेश राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तिसर्‍या सत्रामध्ये बुरखा घालून मतदान करण्यास आलेल्या महिलांनी ओळख पटवण्यासाठी बुरखा काढून चेहरा दाखवण्यात आल्यावरच त्यांना मतदान करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती क्युबेक प्रांताचे अधिकारी फिलिपी कौइलार्ड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

डेन्मार्कमध्येही बुरख्यावर बंदी

डेन्मार्कच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. यापूर्वी युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्ड, बुल्गेरिया, जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांनी बुरख्यावर बंदी घातली आहे.

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे, तसेच इमारतींमध्ये चेहरा लपवण्यात येणारे कपडे परिधान करणे या प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे.

ऑस्टे्रलियात बुरख्यावर बंदी घालावी, यासाठी महिला खासदाराचा बुरखा घालून संसदेत प्रवेश

ऑस्ट्रेलियामध्ये बुरख्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी येथील महिला खासदार पाऊलिन हँसन यांनी संसदेत बुरखा घालून प्रवेश केला. यामुळे अन्य खासदारांनी त्यांच्यावर टीका केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now