देशातील ९५ सहस्र ९२९ घोटाळ्यांत ३२ सहस्र ९१ कोटींचा अपहार !
‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी पोलिसांत ‘सायबर क्राईम’ असा स्वतंत्र विभाग आहे; मात्र रिझर्व्ह बँकेत ‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी ‘सायबर क्राईम’ असे वर्गीकरणच नाही. वर्ष २०२२-२३ मध्ये आर्.बी.आय.अंतर्गत येत असलेल्या देशातील सर्व बँकांमध्ये एकूण ९५ सहस्र ९२९ घोटाळे झाले.