भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापकास फैलावर घेतले !

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी अधिकोषाच्या व्यवस्थापकास फैलावर घेऊन शेतकर्‍यांना त्वरित साहाय्य देण्यास सांगितले. या वेळी महाले यांनी व्यवस्थापकांना क्षमा मागायला लावली. या वेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व !

२१ पैकी ६ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित १५ जागांसाठी मतदान झाले. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर सिद्ध झालेल्या शिवसेनेच्या विरोधी पॅनेलने सत्ताधार्‍यांना चांगली लढत दिली.

रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे तातडीने विलिनीकरण करण्याची ठेवीदारांची मागणी !

रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांची पूर्ण रक्कम मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलून तातडीने विलिनीकरण करावे, अशी मागणीही रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदार हक्क समितीने पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी आमचा वापर केला ! – चंद्रदीप नरके, शिवसेना

महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या. असे असतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला का साहाय्य करत नाही ?’’

थकबाकी असलेल्यांच्या हाती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सूत्रे गेल्याचे दु:ख ! – सतीश सावंत, शिवसेना नेते

पराभवावर बोलतांना सावंत म्हणाले, ‘‘या निवडणुकीत धनशक्ती आणि बळ यांचा वापर केला गेला. संतोष परब यांच्यावर आक्रमण करून ‘आमच्यासोबत राहिला नाहीत, तर तुमचाही संतोष परब होईल’, अशी भीती मतदारांमध्ये निर्माण केली गेली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपची सत्ता

या निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचा निसटता पराभव झाला. सावंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून नाव निवडण्यात आले. त्यामध्ये देसाई विजय झाले. सावंत यांचा झालेला पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले ! – केंद्रीय अर्थमंत्री

देशातील अनेक बँकांची सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या व्यावसायिकांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत !

देशात अधिकोषांतील निष्क्रीय खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून ! – केंद्रीय अर्थमंत्री

देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून असून त्यांपैकी ९ कोटी खाती अशी आहेत, ज्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे मलकापूर (जिल्हा बुलढाणा) अर्बन बँकेत ग्राहकांची गर्दी !

या बँकेच्या २८ शाखा असून १ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नवीन मालमत्ता विक्रीवर बंदी असून कर्जाचे नूतनीकरणही सध्या करता येणार नाही.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता !

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपद निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असून राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ५, तर शिवसेना ३ जागी विजयी झाली आहे. महाविकास आघाडीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत