ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

जयपूर (राजस्थान) येथे होणार्‍या ज्ञानम महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी सहभाग घेतला.

धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजमनाला जागृत करणारी सनातनची ग्रंथमालिका !

सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !

तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !

तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

हिंदूंना गतवैभव मिळावे !

विदिशा, धार आणि एरंडोल यांसारख्या अनेक वास्तू धर्मांधांच्या तावडीतून सोडवायला हव्यात. ‘धर्मांधांच्या कह्यातील हिंदूंच्या सर्वच वास्तू आणि मंदिरे यांची मुक्ती होऊ दे. त्यांची पुनर्स्थापना लवकरात लवकर होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळू दे आणि भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होऊ दे, अशी धर्मनिष्ठ हिंदूंची आर्त प्रार्थना !

विदिशा (मध्यप्रदेश) येथील परमार वंशाच्या प्राचीन राजमहालावर धर्मांधांचे नियंत्रण प्रशासनने हटवले !

राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच या विभागाने हिंदूंना तेथून हाकलून लावले असते !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !  

#KashmiriHindusExodus_31Yrs हा हॅशटॅग ट्रेंड चौथ्या क्रमांकावर !

१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर  #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.

धर्म टिकवण्याचे स्वातंत्र्य असणारे काश्मिरी हिंदू आणि त्यांच्या सुरक्षेचे शासनावरील दायित्व

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’च्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी लढत आहेत.