गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषीमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.                         

गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.            

गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

आजचा वाढदिवस – चि. समर्थ पागनीस

नागपूर येथील चि. समर्थ मंगेश पागनीस (वय १ वर्ष) याचा ज्येष्ठ कृष्ण पक्ष षष्ठी (२३.६.२०१९) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now