रूढी आणि परंपरा यांविषयीचा अभ्यास न करता त्याला विरोध करणे पूर्णतः अयोग्य आहे ! – अश्‍विनी कुलकर्णी, प्रवक्त्या, सनातन संस्था

हिंदूंंच्या केवळ काही मंदिरांमध्येच महिलांना प्रवेश नाही. असे असतांना त्या मागील रुढी आणि परंपरा यांविषयीचा अभ्यास न करता त्याला विरोध करणे पूर्णतः अयोग्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या अश्‍विनी कुलकर्णी यांनी केले.

मंदिरात प्रवेश करणार्‍या महिला भक्त नसून ती कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांची ‘स्टंटबाजी’ ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

दोन महिलांना अत्यंत छुप्या पद्धतीने पोलिसांच्या संरक्षणातून अय्यप्पा भगवानांचे दर्शन घेण्यासाठी नेण्यात आले होते. त्या भगवान अय्यप्पांच्या भक्त नसून कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत, असे आता उघड झाले आहे.

राज्यघटनेची प्रत घेऊन सोबत चाललो, तर नक्षलवादी आणि दंगेखोर आम्हाला जिवंत सोडणार आहेत का ?

जसे महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांची परंपरा तुम्ही मानता, तसे भारताला राम, कृष्ण या अवतारांसह छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरा आहे. क्षात्रधर्माची परंपरा आहे. स्वरक्षण हा अधिकार आहे. कोणी जर शस्त्र ठेवत असेल…..

भारत आणि चीन यांच्यात सीमाप्रश्‍नी चर्चा

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अन् चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यांच्यात सीमाप्रश्‍नावर चर्चा झाली. शिखर बैठकीनंतर दोन्ही देशांत द्वीपक्षीय चर्चा चालू आहे. ‘दोन्ही देशांनी संवाद साधत मतभेद न्यून केले असून सीमावर्ती भागात आता स्थिरता आहे’

मंदिरे ही ज्ञानाची केंद्र बनली पाहिजेत ! – पंडित वसंत गाडगीळ

मंदिरे ही ज्ञानाची केंद्र बनली पाहिजेत. सद्यस्थितीत मंदिरातील वाढत्या अर्थकारणाला सकारात्मक दिशा देण्याची आवश्यकता आहे, असे मत गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आपल्या मंदिरांची स्थिती’ या चर्चासत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश उल्लंघून वर्षभर मशिदींवर वाजणार्‍या भोंग्यांवर कारवाई का नाही ? – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

फटाक्यांमुळे होणारा अपव्यय टाळून तो पैसा राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला गेला पाहिजे. फटाक्यांवर कायमचीच बंदी आणली पाहिजे, अशी हिंदु जनजागृती समितीची भूमिका आहे.

शहरांची नावे (आक्रमकांकडून) अन्यायाने पालटण्यात आली होती, ही वस्तूस्थिती ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘आखाडा’ या कार्यक्रमात औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

फटाक्यांसाठी होणारा पैशांचा अपव्यय टाळून ते पैसे राष्ट्र-धर्म कार्यासाठी वापरले जावेत ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

दिवाळी या सणाचा फटाक्यांशी काहीही संबंध नाही. फटाक्यांसाठी होणारा पैशांचा अपव्यय टाळून ते पैसे राष्ट्र-धर्म कार्यासाठी वापरले जावेत. हिंदु जनजागृती समिती यासाठी गेली १० वर्षे चलचित्रे, समाजिक प्रसारमाध्यमे, प्रवचने आदी माध्यमांतून हिंदूंचे प्रबोधन करत आहे.

जिल्ह्यांच्या होत असलेल्या नामांतराचे हिंदूंकडून स्वागतच ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

फैजाबादचे ‘अयोध्या’ असे नामकरण झाले, त्याविषयी योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा आहे आणि अशा विविध नामांतराचे हिंदूंकडून स्वागतच होईल, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

चर्चासत्राच्या वेळी हिदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणारे ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे निवेदक !

२७ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना चर्चासत्रासाठी निमंत्रित केले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now