लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !  

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील शिवपुरी गावामधील ऐतिहासिक रणबाबा महादेव मंदिरामध्ये १९ जानेवारीच्या रात्री अज्ञातांनी लूटमार करत येथील ८० वर्षीय बाबा फकीरे दास यांच्यावर प्राणघातक शस्त्राद्वारे वार करून हत्या केली.

(सौजन्य : ABP Ganga)

येथील दानपेटीतील पैसे पळवून नेण्यात आले, तसेच ३ घंटा आणि मंदिरात असणारे धान्य हेही या चोरट्यांनी पळवून नेले. गावकर्‍यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून बाबा फकीरे दास येथे रहात होते. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.