कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला फटकारले !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अफगाणिस्तानमध्ये कट्टरतावाद्यांकडून भगवान बौद्धाची मूर्ती तोडल्याची घटना आजही आमच्या आठवणीत आहे. आतंकवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये शिखांच्या गुरुद्वारामध्ये आक्रमण करून २५ शिखांना ठार केले होते.

नुकतेच पाकमधील करक येथे धर्मांधांच्या जमावाने एक हिंदु मंदिर तोडून त्याला आग लावली. स्थानिक प्रशासनाच्या समर्थनामुळे धर्मांधांना हे करणे शक्य झाले. त्या वेळी प्रशासन मूकदर्शक होऊन पहात होते, अशी टीका भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकवर केली.