आज २६ जानेवारी २०२१ या दिवशी असलेल्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने…
धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजमनाला जागृत करणारी सनातनची ग्रंथमालिका !
सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !
राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपाय
बांगलादेशींची घुसखोरी, काश्मीरची समस्या, पंथांधांचा वन्दे मातरम् ।ला विरोध, प्रस्तावित हिंदुद्वेषी सांप्रदायिक हिंसा प्रतिबंधक कायदा आदींपासून राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण होण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
हिंदु धर्मावरील आक्रमणांवर उपाय
देश आणि धर्म यांच्या मुळावर उठलेला लव्ह जिहाद, छळ-बळ यांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर, गोहत्या आदींविषयी विवेचन करून त्यांवर उपाय सांगणारा हा ग्रंथ म्हणजे, प्रथम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातील मान्यवरांची बोधपर व्याख्याने !
लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती
राष्ट्राच्या उभारणीसाठी समस्त नागरिकांनी संघटित होऊन लोकशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता इत्यादी दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैधरित्या (कायदेशीरपणे) कसा लढा द्यावा, याविषयी दिशादर्शन करणारा ग्रंथ !
लव्ह जिहाद (धर्मसंकटाचे स्वरूप व उपाय)
- जिहाद म्हणजे हिंदु स्त्रीला प्रेमात फसवून वेश्या किंवा जिहादी बनवण्याचे षड़यंत्र !
- लव्ह जिहादचे संकट वेगाने फोफावण्याची प्रमुख कारणे
- लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण हवे !
- हिंदु तरुणी आणि त्यांचे पालक यांनी घ्यायची दक्षता !