काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे स्थानांतरासाठी अद्यापही आंदोलन चालूच !

स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करूनही सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळणे लज्जास्पद !

काश्मीरमधील हिंदूंचे सुरक्षित स्थलांतर करा !

काश्मीर खोर्‍यात सध्या आतंकवादी कारवाया वाढत असतांना सरकार आम्हाला येथून स्थलांतर करण्याची अनुमती देत नाही. ही सरकारची असंवेदनशीलता आहे. आतंकवाद्यांनी भित्तीपत्रके आणि पत्र प्रसारित करून काश्मीरमधील हिंदूंना ठार करण्याची धमकी दिली आहे.

काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्रात अभ्यासक्रमात जागा !

काश्मिरी पंडितांवरील आक्रमणाच्या प्रकरणी शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काश्मिरी पंडितांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

दंगलखोर ‘रझा अकादमी’कडून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात निदर्शने !

दंगली घडवून हिंदुद्वेष दर्शवणार्‍या ‘रझा अकादमी’चा हा प्रकार म्हणजे ‘काश्मिरी हिंदूंवरील खोट्या प्रेमाचा आलेला पुळका’ असे म्हटल्यास चूक ते काय ?

काश्मीरमधून ३ दिवसांत ८० टक्के काश्मिरी हिंदूंचे पलायन !

अनंतनाग, बारामुला आणि श्रीनगरमधील छावण्यांमध्ये रहाणारी अनेक हिंदु कुटुंबांना प्रशासनाने बाहेर पडण्यास बंदी घातल्याने ती बाहेर पडू शकत नाहीत.

काश्मीरमधील ५ सहस्र काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर !

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे.

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे

आतंकवादी हिंदु सरकारी कर्मचार्‍यांची सूची बनवून त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता ! – जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वैद

वर्ष २०१६-१७ मध्ये ज्या प्रमाणे जिहादी आतंकवादी सूची बनवून पोलिसांना ठार मारत होते, त्याचप्रमाणे आता त्यांनी हिंदु सरकारी कर्मचार्‍यांची सूची त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता आहे.

नरसंहार कुणाचा ? फक्त काश्मिरी पंडितांचा कि समस्त हिंदूंचा ?

आतंकवाद्यांनी सरसकट सर्वच हिंदूंच्या हत्या केल्या आहेत आणि  आजही ते करत आहेत; कारण त्यांच्यासाठी सर्वच हिंदू ‘काफिर’ होते आणि काफिरांविरुद्धच त्यांचा जिहाद चालू आहे…

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !