कल्याण वाहतूक विभागाचा लाचखोर वाहतूक वॉर्डन कह्यात !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ३ एप्रिल (वार्ता.) – तक्रारदारांची दुचाकी कल्याण येथील वाहतूक पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून जप्त केली होती. ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसाने तक्रारदारांकडे ३ सहस्र रुपये मागितले. तडजोडीअंती ठरलेली २ सहस्र रुपयांची रक्कम घेतांना कल्याण वाहतूक उपशाखेचा वाहतूक वॉर्डन (वाहतूक पोलिसांच्या साहाय्यासाठी नेमलेली व्यक्ती) वैभव शिरसाट (वय २६ वर्षे) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

तळागाळापर्यंत मुरलेली भ्रष्ट मनोवृत्ती प्रगतीपथावरील देशासाठी धोकादायक !