
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – उंचगाव हे ६० सहस्र लोकवस्तीचे गाव असून उंचगावला कडक उन्हाळ्यामध्ये अखंडित विजेचा पुरवठा व्हावा. याचसमवेत वादळी वार्यामुळे वीज खंडित झाली, तर त्यासाठी लागणारे साहित्य उंचगाव शाखेमध्ये उपलब्ध असावे, जेणेकरून तात्काळ वीजजोडणी करता यावी, या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी साहाय्यक वीज अभिययंता अमोल गायकवाड यांना दिले.
या प्रसंगी विक्रम चौगुले, दीपक पाटील, योगेश लोहार, संतोष चौगुले, दत्ता फराकटे, अजित चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.