शहापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदूंकडून यात्रेमध्ये झटका मांसाची मागणी !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – गेल्या काही दिवसांपासून हिंदूंमध्ये ‘हलाल’विषयी जागृती होत आहे. अनेक गावांमध्ये हिंदु नागरिक ‘हलाल’ पद्धतीचे मांस नको, तर झटका पद्धतीचे मांस हवे, अशी मागणी करत आहेत. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या प्रबोधनानंतर शहापूर यात्रेत अनेक ठिकाणी हिंदूंनी नुकत्याच झालेल्या यात्रेत ‘झटका पद्धतीचेच मांस हवे’, अशी आग्रही मागणी केली. (हिंदूंमध्ये अशा प्रकारे होणारी जागृती स्तुत्य  ! – संपादक)

या संदर्भात विश्व हिंदु परिषदेचे श्री. अमित कुंभार म्हणाले, ‘‘हिंदूंमध्ये जागृती होत असून ते स्वत:हून ‘झटका’च हवे, अशी मागणी करत आहे. येणार्‍या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा होतील. त्या यात्रांमध्ये हिंदूंनी ‘हलाल’वर बहिष्कार घालून ‘झटका’चीच मागणी करावी. हिंदूंनी पुढे येऊन या कृतीला पाठिंबा द्यावा.’’ झटका पद्धत राबवण्यासाठी हिंदु खाटीक समाजातील युवक पुढे आले. त्यास हिंदूंनी प्रतिसादही मोठ्या प्रमाणात दिला. यासाठी विहिंपचे राजू लाटने, मनोहर पवार, अभिजीत शेटके, अक्षय शेटके यांनी विशेष प्रयत्न केले.