Malda Hindus Attacked : मालदा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण

  • हिंदूंच्या दुकानांना केले लक्ष्य

  • भाजपची राज्यपालांना पत्र लिहून केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्याची मागणी

मालदा (बंगाल) – मालदा जिल्ह्यातील मोथाबारी भागात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहेत. यात धर्मांध मुसलमान रस्त्यावर उतरून हिंदूंची दुकाने आणि घरे यांना लक्ष्य करतांना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ३४ जणांना अटक केली आहे. सध्या येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

१. पोलिसांनी सांगितले की, २६ मार्च या दिवशी एक मिरवणूक काढण्यात आली होती. ती स्थानिक परिसरात असेल्या एका मशिदीजवळून गेली. या वेळी काही लोकांनी मशिदीजवळ फटाके फेकल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर काही लोकांनी विरोध केला. या वेळी अचानक पोलिसांवर दगडफेक करत वाहनाची तोडफोड करण्यात आली. यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या वेळी जमावाने परिसरातील सार्वजनिक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड केली.

२. विरोधी पक्षनेते असणारे भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी या आक्रमणाचे काही व्हिडिओ प्रसारित करत म्हटले की, मोथाबारीमध्ये हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य केले जात आहे. यासह अधिकारी यांनी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मोथाबारी परिसरात हिंदूंच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्याची मागणी केली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला आहे की, या भागात हिंदूंना धोका वाढत असून त्यांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

३. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार यांनीही या घटनांचे व्हिडिओ प्रसारित केले आणि लिहिले की, ‘‘मोथाबारी येथील भयानक दृश्ये.’ हिंसक जमावाने हिंदूंची घरे आणि दुकाने उद्ध्वस्त केली. ममता बॅनर्जी आणि त्यांचे बघ्याची भूमिका घेणारे पोलीस काय करत आहेत ? ते मौन बाळगून आहेत. त्यांच्या निर्लज्ज लांगूलचालनाच्या राजकारणाची किंमत आहे – अराजकता, भीती आणि हिंदूंवरील अन्याय !’’

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये भाजपने अशा प्रकारची मागणी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारला राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यास सांगितले पाहिजे, तरच हिंदूंचे आणि देशाचेही रक्षण होईल !