सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के !

‘राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रा’ने केलेले ट्वीट मधील छायाचित्र

सोलापूर – ३ एप्रिल या दिवशी जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांतील काही भागांत सौम्य भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणांसाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिक्टर स्केलवर २.६ इतकी होती. ‘राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रा’ने याविषयीचे ट्वीट करत माहिती दिली आहे. सांगोला येथे भूमीच्या ५ किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता.