Sukma Naxal Encounter : सुकमा (छत्तीसगड) येथे चकमकीत १६ नक्षलवादी ठार

सुकमा (छत्तीसगड) – येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले, तर २ सैनिक घायाळ झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, असे सांगण्यात आले आहे. गेल्या एक वर्षात आतापर्यंत ४१० नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षादलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहीम राबवत असतांना केरळपाल पोलीस ठाण्याच्या सीमेतील जंगलात ही चकमक झाली.

३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करणार ! – अमित शहा

या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून म्हटले की, सरकार ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्यास वचनबद्ध आहे. शस्त्र बाळगणार्‍यांना माझे आवाहन आहे की, शस्त्रे आणि हिंसाचार पालट घडवू शकत नाहीत, तर केवळ शांतता अन् विकासच पालट घडवू शकतात.