गिर्ये येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या नौकेवर कारवाई 

देवगड – तालुक्यातील गिर्ये येथील समुद्रकिनार्‍याजवळ अनधिकृतपणे प्रकाशझोतात (‘एल्.ई.डी.’ दिव्यांद्वारे) (‘एल्.ई.डी.’ म्हणजे ‘लाईट एमिटिंग डायोड’) मासेमारी करणार्‍या नौकेवर २ एप्रिलच्या मध्यरात्री मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने कारवाई केली. या नौकेवर तांडेलसह ३ खलाशी होते. ही नौका कह्यात घेऊन ती आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आली आहे. नौकेत प्रकाश झोताचे साहित्य, जनरेटर आणि अन्य साहित्य मिळून अंदाजे ३ – ४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी नौकेच्या मालकाला अनुमाने ५ लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे.