ठाकुर्ली (डोंबिवली) येथे वारंवार वीजपुरवठा खंडित !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ३ एप्रिल (वार्ता.) – ठाकुर्ली येथील काही परिसरात महावितरणचा वीजपुरवठा ५ ते ६ घंटे खंडित होतो. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयाकडून याविषयी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.