VIDEO – ‘हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍यालाच मतदान करू’, असे लोकप्रतिनिधींना ठामपणे सांगा ! – राजीव शाह, अध्यक्ष, सायबर सिपाही (दक्षिण राज्य) भाग्यनगर, तेलंगाणा

देशात दहशतवाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, दरोडे आदी वाढत असतांना पोलीस ते सोडून हिंदु संघटनांच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत, हे हिंदूंचे दुर्देव आहे. भोपाळमध्ये हिंदु देवतांविषयी खोटा प्रसार करून हिंदूंचे  धर्मांतर केले जात आहे.

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील.

पुणे (टिळेकरनगर) येथे गोवंशियांना वाचवण्यात यश !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत नसल्याने सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवी !

मध्यप्रदेशातील सुराणा कुटुंबाने ११ कोटी रुपयांची संपत्ती दान करून घेतला संन्यास !

व्यवहाराची मर्यादा लक्षात आल्याने अध्यात्माची कास धरण्याचे हे आणखी एक उदाहरण ! अशा असंख्य उदाहरणांमुळेच ज्यांना बुद्धी आणि त्याद्वारे मिळणारे सुख हेच सर्वश्रेष्ठ वाटते, अशा बुद्धीप्रामाण्यावाद्यांची कीव आल्याखेरीज रहात नाही !

अलवर (राजस्थान) येथे शिवमंदिरानंतर आता गोशाळा अनधिकृत ठरवून पाडली !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ते ठरवून हिंदूंची मंदिरे आणि गोशाळा यांवर कारवाई करून धर्मांधांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या !

जागा खाली करण्यासाठी सिडकोने पाठवलेल्या नोटिसीमुळे आसूडगाव (जिल्हा रायगड) येथील गोशाळेतील २६० गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न !

हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते.

देशातील प्रत्येक गावात गोशाळा हवी !

प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारली, तरी पुरणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरच नव्हे, तर ग्राम पातळीवरही गोशाळा निर्माण केल्या पाहिजेत, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून पुणे शहरात गोशाळा उभारणारे बांधकाम व्यावसायिक श्री. राहुल रासने

शहरामध्ये गोमय (देशी गायीचे शेण) आणि गोमूत्र मिळणे अवघड जात होते. पुष्कळ प्रयत्न करून पुण्याबाहेरून शेण, गोमूत्र किंवा जीवामृत मागवावे लागत असे. यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे नेहमी मनात येत होते….

सोलापूर येथे ३५ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.