
पुणे – औरंगजेबाने शंभूराजेंचे हाल-हाल केले, छळ केला, यात त्याची क्रूरता आपल्याला दिसली, तर शंभूराजांचे शौर्यही आपण पाहिले आहे. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, जी भावना जनतेची आहे, तीच आमची भावना आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या बलीदानदिनानिमित्त शंभूराजेंच्या समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शिवरायांच्या गडदुर्गांचे संवर्धन करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे, हे आमचे काम आहे. गडावर जी अतिक्रमणे आहेत, ती काढली गेली पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक तीर्थक्षेत्र होणार आहे. मी मुख्यमंत्री असतांना ३५० ते ४०० कोटी रुपयांच्या निधीचे प्रावधान केले आहे. वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला साजेसे तीर्थक्षेत्र होईल. आमचे सरकार हे शेतकर्यांच्या पाठीशी उभे रहाणारे सरकार आहे. लाडक्या बहिणींना २ सहस्र १०० रुपये दिले जातील.