(म्हणे) ‘वक्फ सुधारणा विधेयक मुसलमानांच्या हिताचे नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

अबू आझमी

मुंबई – ज्या लोकांनी सरकार आल्यानंतरही मुसलमानांच्या हिताचे एकही काम नाही केले, ते लोक मुसलमानांच्या मशिदींच्या खाली मंदिर शोधत आहेत. मंदिर भरल्यानंतर लोक प्रार्थना करण्यासाठी बाहेर उभे राहू शकतात; पण मशिदी भरल्यानंतर मुसलमान लोक बाहेर नमाज पढू शकत नाहीत. जर तसे केले, तर परवाने रहित केले जात आहेत. हे लोक जे विधेयक आणत आहेत, ते मुसलमानांच्या हिताचे असूच शकत नाही, अशी मुक्ताफळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उधळली आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकावर, तसेच केंद्र सरकारवर टीका केली. (मुसलमान संपूर्ण रस्ता स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे समजून तेथे नमाजपठण करतात; मात्र मंदिराच्या बाहेर येऊन हिंदू प्रार्थना करत असल्याचे आझमी यांनी एकतरी उदाहरण दाखवावे. रस्त्यावर नमाजपठण करण्याचा मुसलमानांना अधिकार नाही. रस्ता सर्वांचा असल्याने त्याच्यावर केवळ एका समाजाची मक्तेदारी कशासाठी ? – संपादक) 

आमदार अबू आझमी पुढे म्हणाले की,

१. केंद्र सरकारला आमच्या भूमी बळकावयाच्या आहेत. आमच्या पूर्वजांनी ज्या भूमी मशिदी आणि स्मशानभूमी यांसाठी जे वक्फ घेतले होते, त्यावर यांचा डोळा आहे. आजपर्यंत या लोकांनी सगळी कामे मुसलमानांच्या विरोधातच केली. (‘चोराच्या उलट्या बोंबा’ ही म्हण सार्थ ठरवणारे अबू आझमी ! वक्फ कायद्यानुसार इतर देवस्थाने किंवा व्यक्ती यांच्या भूमी सहजपणे लाटता येत होत्या; पण आता कायद्यातील सुधारणेमुळे तसे करता येणार नाही. आतापर्यंत वक्फ कायद्याच्या झालेल्या गैरवापराविषयी आझमी जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत ! – संपादक)    

२. देशाला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी यांचे हे पाऊल पडत आहे. मुसलमानांवर अन्याय केला जात आहे. (आतापर्यंत जगातील सर्व मुसलमान नेत्यांनी, तसेच जाणकारांनी भारतात मुसलमान सुरक्षित असल्याचे घोषित केले आहे. असे असतांनाही अबू आझमी यांना अन्याय केला आहे, असे वाटत असेल, तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन रहावे. – संपादक)

३. राज्यसभेतही हे विधेयक मान्य होणार आहे; कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. मी पक्षातील वरिष्ठांशी बोलून पुढील भूमिका ठरवीन. देशातही भाजपचे बहुमत आहे, त्याच आधारे, तर बाबरी मशिदीत मंदिर बनवण्यात आले आहे; मात्र आम्ही या विधेयकाचा विरोध करणार आणि करतच रहाणार. (आक्रमक बाबराने बळजोरीने श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद उभी केली होती. आता बाबरी पाडून श्रीराममंदिर उभे केले, तर अबू आझमी यांच्या पोटात का दुखले ? बाबरी मशिदीत मंदिर बसवले, ही योग्यच कृती आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका :

वक्फ सुधारणा विधेयकाविषयी मुसलमानांची दिशाभूल करणार्‍या आझमींसारख्या धर्मांधांवर कठोर कारवाई अपेक्षित !