PM Modi Nagpur Visit : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संघसंचालित माधव नेत्रालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन !

  • पंतप्रधान मोदी यांचा ऐतिहासिक नागपूर दौरा

  • संघाच्या स्मृतीमंदिरासह दीक्षाभूमीला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागपूर येथे दौर्‍यावर येणार आहेत. वर्ष २०१४ मध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत, तर दुसर्‍यांदा येथील दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. वर्ष २०१७ मध्ये ते दीक्षाभूमीत आले होते. ३० मार्चला सकाळी ९ च्या सुमारास ते रेशीमबागच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होतील. तेथून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संचालित माधव नेत्रालयाच्या नवीन वास्तूच्या भूमीपूजन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते संरक्षणक्षेत्रातील अग्रेसर कमानी सोलार इंडस्ट्रीज येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. अशा प्रकारे त्यांचा ५ घंट्यांचा नागपूर दौरा आहे.

१. माधव नेत्रालयाच्या नवीन वास्तूच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत एकाच मंचावर असतील.

२. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदी स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत.

३. मुंबईची चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी ही दोन्ही स्थळे बौद्ध धर्मियांची अत्यंत पवित्र स्थाने आहे. यामुळे मोदी दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत.