Kondhwa Center For Jihadists : पुण्यातील कोंढवा भागात झळकला सौदी अरेबियाचा झेंडा !

‘सुदर्शन मराठी’च्या ‘एक्स’ या ट्विटर हँडलवरील पोस्ट !

पुणे – ‘कोंढव्यात झळकला सौदी अरेबियाचा झेंडा ! कोंढवा बनवतोय जिहाद्यांचे केंद्र ?’, असा मजकूर सुदर्शन मराठीच्या ‘एक्स’ या ट्विटर हँडलवर प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये कोंढव्यात सौदी अरेबियाचा झेंडा झळकतांना दिसत आहे. कोंढव्याची परिस्थिती गंभीर आहे. सामाजिक माध्यमांवरील काही वापरकर्त्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, कोंढवा ‘मिनी पाकिस्तान’ असल्याचे म्हटले आहे. कोंढव्याला पुण्यातील नागरिक ‘मिनी पाकिस्तान’, असे संबोधतात, ही वस्तूस्थिती आहे.

या ठिकाणी आतंकवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ आहे, (‘स्लीपर सेल’ म्हणजे नागरिकांमध्ये राहून आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या लोकांचा गट निर्माण करणे) असा केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. आतंकवादी कारवायांसाठी कोंढवा केंद्रस्‍थानी आहे.

संपादकीय भूमिका

या घटनेची सत्यता पडताळून पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करत त्यांना सौदी अरेबियात हाकलले पाहिजे !