न्यायालयातील असुविधेविषयी खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून असंतोष व्यक्त

प्रकृती नीट नसतांनाही न्यायालयात बोलावले, तर बसायला नीट जागा तरी हवी. पाठीच्या त्रासामुळे बाकड्यावर (बेंचवर) बसू शकत नाही. खिडकीतील धुळीमुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. याचे दायित्व कोण घेणार ? गुन्हा सिद्ध झाल्यास हवे तर मला फासावर लटकवा…..

(म्हणे) ‘हा महात्मा गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या विचारसरणीचा विजय !’

जर हा म. गांधी यांच्या विचारसरणीचा पराभव आहे, तर तो का आहे, याचा विचार दिग्विजय सिंह आणि काँग्रेस यांनी वस्तूनिष्ठपणे केला पाहिजे !

माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल ! – साध्वी प्रज्ञासिंह

असे विधान किती विजयी उमेदवार करतात ? हिंदूंना आतंकवादी ठरवणारे दिग्विजय सिंह यांचा साध्वी यांनी केलेला पराभव, म्हणजेच हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !

साध्वी प्रज्ञासिंह कथित आक्षेपार्ह विधानांवरून २१ घंट्यांचे मौन पाळणार

साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांविषयी पुन्हा एकदा क्षमा मागत २१ घंट्यांचे मौन व्रत करणार असल्याचे घोषित केले आहे. साध्वी यांनी ट्विटरवर म्हटले….

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याविषयी विचार करा !’ – बिहारचे जदयुचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपला सल्ला

भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना पक्षातून काढले, तरी ‘नथुराम गोडसे प्रखर देशभक्तच होते’, अशीच इतिहासात त्यांची नोंद होईल’ हे नितीश कुमार यांनी लक्षात ठेवायला हवे !

साध्वी प्रज्ञा का नाथूराम गोडसे के विषय में दिया गया बयान असहनीय है ! – नितीश कुमार

भारत के विभाजन को मान्यता देनेवालों को कैसे सहते हैं ?

देशाच्या फाळणीला मान्यता देणारे ‘देशभक्त’ होते का ?

‘नथुराम गोडसे देशभक्त होते’, असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी विधान केल्यानंतर, ‘भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार करावा. आम्ही अशा प्रकारची विधाने सहन करू शकत नाही’, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची क्षमा मागते ! – साध्वी प्रज्ञासिंह

पं. नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटल्याचे प्रकरण : साध्वींना त्यांची मते मांडण्याचेही स्वातंत्र्य दिले जात नसेल, तर त्यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती पहाता त्या निवडून येतील, हे निश्‍चित !

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांना मी कधीही हृदयातून क्षमा करू शकणार नाही !’ – पंतप्रधान मोदी

म. गांधी यांच्यामुळे भारताची फाळणी झाली. ते फाळणी रोखू शकले असते . . . या सर्व कृत्यांवर म. गांधी यांनी कधीही क्षमा मागितलेली नाही. त्यामुळे या आणि अन्य हिंदुविरोधी कृत्यांमधून धर्मप्रेमी हिंदू कधीही म. गांधी यांना हृदयापासून क्षमा करू शकणार नाहीत, हे पंतप्रधान मोदी यांनीही लक्षात ठेवले पाहिजे !

देशाच्या फाळणीला संमती देणार्‍यांना हिंदू कधी क्षमा करतील का ?

नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हणणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह यांनी जरी क्षमा मागितली असली, तरी मी हृदयातून त्यांना कधीही क्षमा करू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF