
पुणे – ‘लाडकी बहीण योजने’चे २१०० रुपये महिलांना कधी मिळणार ? हे आताच सांगता येणार नाही. त्यासाठी ५ वर्षे वाट पहावी लागेल. योग्य वेळ येताच पैसे दिले जातील, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. ३ ते २६ मार्च या कालावधीत झालेल्या विधीमंडळ कामकाजाविषयी डॉ. गोर्हे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.