आमदारांच्‍या पात्रतेविषयीच्‍या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्‍याची काँग्रेसची मागणी !

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्‍या दोन्‍ही गटांकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात परस्‍परविरोधी याचिका करण्‍यात आल्‍या आहेत.

धनगर समाजाला न्‍यायालयात टिकेल असे आरक्षण देऊ ! – मुख्‍यमंत्री

धनगर समाजाच्‍या आरक्षणाविषयी सरकार घाईगडबडीत निर्णय घेऊ इच्‍छित नाही. न्‍यायालयातही टिकू शकेल असे आरक्षण धनगर समाजास देण्‍याची आमची भूमिका असल्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्‍या शिष्‍टमंडळासमवेत झालेल्‍या बैठकीनंतर मत व्‍यक्‍त केले.

अंबेजोगाई येथे होणार देशी गोवंशियांचे संवर्धन !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे.

आगामी काळातील सार्वजनिक सण, उत्‍सव मंगलमय वातावरणात, शांततेत साजरे करा ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

सार्वजनिक गणेशोत्‍सव हा राज्‍यातील मोठा उत्‍सव आहे. आगामी काळातील येणारे सर्व सण आणि उत्‍सव जल्लोषात, गुण्‍यागोविंदाने, भक्‍तीभावाने आणि मंगलमय वातावरणात कोणतेही गालबोट न लागता साजरे करावेत, असे आवाहन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

खातेधारकांनी बॅरिकेट्‍स तोडल्‍याने पोलिसांचा लाठीमार !

घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

मराठवाड्याला ‘मागास’ शब्‍दापासून मुक्‍ती मिळाली पाहिजे ! – मुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले की, मराठवाडा मुक्‍तिसंग्राम दिनाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा. अनेक ध्‍येयवादी स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या अमूल्‍य बलीदानातून आणि जनतेच्‍या सक्रीय पाठिंब्‍यातून मराठवाडा निजामाच्‍या जुलमी राजवटीतून मुक्‍त झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने राज्‍यात ११ कलमी कार्यक्रम राबवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

नमो तीर्थस्‍थळ आणि गडदुर्ग संरक्षण अभियानातून ७३ पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्‍थळांची सुधारणा आदी कार्यक्रम या अभियानातून राज्‍यात राबवण्‍यात येणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

दुष्काळ स्थिती भोगणार्‍या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांची ४५ सहस्र कोटींच्या निधीची घोषणा !

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी ४५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. यात सिंचनासाठी २७ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे

औरंगाबाद जिल्हा झाला ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ !

औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव, तसेच उस्मानाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांचे नाव पालटण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र प्रकाशित करून पालटण्यात आले आहे.

मराठा समाजाच्‍या कल्‍याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

आपण सर्वांच्‍या आग्रहास्‍तव उपोषण मागे घेत आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंंतरवाली सराटी येथे केली होती. मनोज जरांगे पाटील त्‍यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन त्‍याच जागी चालू ठेवणार आहेत.