DMK’s A Raja : (म्हणे) ‘हिंदु धर्माची प्रतीके धारण करू नका आणि संघीयांपासून लांब रहा !’

द्रमुकचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांचा कार्यकर्त्यांना हिंदुद्वेषी सल्ला !

ए. राजा

चेन्नई –  तमिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष द्रमुकचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी पुन्हा एकदा हिंदुद्वेषी विधान केले आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला देतांना म्हटले, ‘हिंदु धर्माची प्रतीके धारण करू नका आणि संघीयांपासून दूर रहा.’ द्रविड मुन्नेत्र कळगम (द्रमुक) पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ए. राजा यांनी पुन्हा एकदा सनातनविरोधी भूमिका मांडली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघीयांसारखा पोशाख करू नये. बिंदी, टिळा, भगवी धोती यांचा त्याग करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

ए. राजा म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला देवाची पूजा करू नका, असे सांगत नाही.  जनतेवर दया दाखवणार्‍या देवाची पूजा करा. अण्णा दुरई यांनी सांगितल्याप्रमाणे निष्पाप हृदयात वास करणार्‍या आणि गरिबांच्या हसण्यात दिसणार्‍या देवाचे आम्ही विरोधक नाही.’

या आधीही ए. राजा यांनी ‘हिंदु धर्म हा भारतासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे’, असे विधान केले होते.