मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

धर्महानी रोखण्यासाठी अविरत कार्य करणारे पाक्षिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे समस्त हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सीबीआयच्या भ्रष्टाचारी उपअधीक्षकाच्या घरावर सीबीआयच्याच पथकाची धाड

कुंपणच जर शेत खात असेल, तर कुणावर विश्‍वास ठेवायचा ? भ्रष्ट राजकारण्यांच्या संगतीमुळे आता अन्वेषण यंत्रणाही भ्रष्ट झाल्या आहेत !

साधनेमुळे भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करणे शक्य ! – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

साधना करत असलेल्या व्यक्तीची स्वतःची सूक्ष्म जाणण्याची क्षमता साधनेमुळे वाढते आणि ती भारतीय अन् पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करू शकते.

राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारीपासून चालू होणार ! – वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच चालू झाले असून येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ जानेवारी या दिवशी दिली.

८९ जणांना जामीन संमत; ठाणे न्यायालयाचा निर्णय

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल या दिवशी जमावाने केलेल्या आक्रमणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणी १६ जानेवारीला ठाणे न्यायालयाने ८९ जणांना जामीन संमत केला आहे.

पेरीड (जिल्हा कोल्हापूर) गावात ग्रामपंचायतीसाठी शून्य टक्के मतदान !

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली ६८ वर्षे गावात निवडणूक झालेली नाही. यंदा ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी निवडणूक झाली. यामुळे बिनविरोध परंपरा मोडीत निघणार म्हणून गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.

पुण्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते १६ जानेवारी या दिवशी येथील कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू झाली. पुणे जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ३१ केंद्रांवर ३ सहस्र १०० जणांना लस देण्यात आली.

प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले.

पुरस्कार आणि तिरस्कार !

बौद्धिक क्षेत्रात वावरणार्‍यांना स्वतःच्या बुद्धीवर अधिक विश्वास असतो. समोर घडणारे वास्तव, त्याची पाळेमुळे स्वीकारण्याचे औदार्य त्यांच्यात नसते. त्यामुळेच साहित्यक्षेत्रात आज धर्मद्रोही आणि विद्रोहीच विचार अधिक प्रमाणात आढळून येतो. मनोहर आणि त्यांनी नाकारलेला पुरस्कार हे त्याचे केवळ प्रतीक आहे !